1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

राजनाथ + अडवाणी + मोदी = राम

राजनाथ
रामाच्‍या नावावर वर्षानुवर्षे राजकारण करणा-या भाजपने दरवेळेप्रमाणे यावेळी अयोध्‍येत रामाचे मंदीर बांधण्‍याचे आश्‍वासन देऊन 'राम' राजकारण सुरू केले आहे. भाजपचे हे राजकारण सर्वसामान्‍य मतदारांना आता नवे नसले तरीही आता या राजकारणात रामाची व्‍याख्‍या मात्र बदलली आहे.

गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामाची नवी व्‍याख्‍या नुकतीच गुजरातमधील आपल्‍या एका सभेत सांगितली आहे. भाजपचे राम (RAM) म्‍हणजे राजनाथ सिंहचा R, अडवाणींचा A आणि मोदींचा M बरोबर RAM असल्‍याचे मोदींनी स्‍पष्‍ट केले आहे.

मोदींच्‍या या वक्तव्‍यामुळे सर्वसामान्‍य मतदारांचा मात्र गोंधळ उडाला असून भाजपच्‍या अजेंड्यात अयोध्‍येचा राम आहे, की मोदींच्‍या मनातला. या गुंत्यात सामान्‍य भाजप कार्यकर्ते अडकले आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा