मध्य प्रदेशात एका व्यक्तीने कुऱ्हाडीने स्वतःचे गुप्तांग कापले; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कुऱ्हाडीने स्वतःचे गुप्तांग कापले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भयंकर कृत्यामागील कारण त्या व्यक्तीने स्वतःच सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छतरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने संत बनण्याच्या इच्छेपोटी स्वतःचे गुप्तांग कापले. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. पीडित व्यक्तीची ओळख भाटीपुरा येथील रहिवासी राममिलन यादव अशी पटली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर राममिलनने सांगितले की, कौटुंबिक जीवनातून मुक्त होण्यासाठी आणि पाप टाळण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले.
Edited By- Dhanashri Naik
