1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09

122 कोटींचा समाजवादी अबू

समाजवादाच्‍या गोष्‍टी करणा-या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍यांकडे ज्यावेळी अवाढव्‍य संपत्ती दिसते तेव्‍हा हेच खरोखरीचे 'समाजवादी' का? असा प्रश्‍न सामान्‍य मतदाराला पडणे साहजिकच आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी आज उ.मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अबू यांनी यावेळी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रानुसार त्‍यांच्‍याकडे सुमारे 122 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अबू आजमी यांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार त्‍यांच्‍याकडे बँकेत 1 लाख रुपये रोख, 12.5 लाख रुपयांचे दागिने, द.मुंबईत 12 कोटींचा बंगला, खंडाळ्यात 75 लाखाचा बंगला, तर कुलाब्यातही 2 कोटींचा बंगला आहे. अबू यांच्‍याकडे तीन आलीशान गाड्या असून त्यात मर्सिडीज, होंडा आणि फियाट या गाडीचा समावेश आहे.

अबू आजमी यांच्‍या या आकडेवारीनंतर ते आजवरचे लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा