1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र

''कांदेपोहे'' नव्हे ''सनई चौघडे''

PR
सुभाष घईंची मुक्ता आर्टस या कंपनीचा मराठी चित्रपट तयार झाला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव आयत्यावेळी बदलण्यात आले आहे. 'कांदेपोहे' या नावाने हा चित्रपट तयार केला जात होता. याच नावाने त्याची प्रसिद्धी करण्यात आली. पण 'कांदेपोहे' हे टायटल आधीच कुणीतरी विकत घेतले होते. त्यांनी घईंना या टायटलचा वापर करण्यास मनाई केली. घईंनी त्याची खूप समजूतही घातली. त्याला पैसेही देऊ केले. पण तो बधला नाही. त्यामुळे आता या चित्रपटाचे नाव 'कांदेपोहे'ऐवजी 'सनई चौघडे' असे ठेवण्यात आले आहे.

PR
श्रेयस तळपदे हा या चित्रपटाचा निर्माता आहे. शिवाय त्याची पत्नी दीप्ती सहनिर्माती आहे. 'सावरखेड-एक गाव' फेम राजीव पाटील हाच 'सनई चौघडे'चा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट म्हणजे 'एका लग्नाची गोष्ट' असल्याचे कळते. त्यामुळे त्याला 'कांदेपोहे' हे नाव सूट होत होते. पण एका मराठी माणसानेच दुसर्‍या मराठी माणसाचे पाय कसे खेचावे याचा धडा शिकायला मिळाला, असे उपरोधिक शब्दांत सांगत श्रेयस तळपदे यांनी नवे टायटल जाहीर केले.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा