पुणे व्हाया बिहार : कथानक
PR
या सर्व सीमा पार करून प्रेमाचे बंध बांधले जातात. प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग सर्व बंधने आणि सीमा आपसुकच गळून पडतात, पण... प्रेमाला विरोध करणारी मंडळी कायम या बंधनातच अडकून पडलेली असतात. याच बंधनातून आपल्या प्रेमाला मुक्त करू पाहणार्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 'पुणे व्हाया बिहार' या आगामी मराठी चित्रपटातून.
नावातच वेगळेपणा असणार्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे 'मारू एण्टरटेन्मेंट', अतुल मारू, केतन मारू यांनी दिग्दर्शन केले आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. चित्रपटात मृणमयी देशपांडेसह, उमेश कामत, अरूण नलावडे आणि भारत जाधव यांच्या मुख्य भूमिकेत आहेत.
