''मैत्र''चा ''धुडगूस''
|
गिरीश साळवी, सतीश मोरे, लक्ष्मण साळुंखे आणि स्नेहल तांबे या नाट्य-चित्रवेड्या तरुणांनी एकत्र येऊन 'मैत्र एंटरटेन्मेंट' या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे 'धुडगूस' या मराठी मल्टिस्टार-बिगबजेट, भव्य सिनेमास्कोप चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
|
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बडे कलाकार 'धुडगूस' मध्ये दिसणार आहेत. संजय नार्वेकर, निर्मिती सावंत, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी, सुहास पळशीकर, विनय आपटे, विजय चव्हाण, अविनाश नारकर, उदय सबनीस, किशोर चौगुले, रवींद्र बेर्डे, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, माधवी जुवेकर, सुहास परांजपे, लीना भागवत, अरुण होर्णेकर, कुशल बद्रिके, शीतल शुक्ल, प्रशांत चोडप्पा, पुर्णिमा अहिरे आदी नामवंतांची मांदियाळी या चित्रपटात आहे.
|
कला-दिग्दर्शक विश्वनाथ मेस्त्री यांच्या कला-दिग्दर्शनाखाली कोल्हापूर येथे किश्याबापूचा मळा, राजपूत वाडी, कोरेगाव आदी ठिकाणी 'धुडगूस'चे चित्रीकरण वेगाने सुरू असून एका सत्रात चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्व करून पुढील तांत्रिक काम पूर्ण केले जाणार आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात भव्य स्वरूपात प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती 'मैत्र एंटरटेन्मेंट'तर्फे कार्यकारी निर्माते पवन वैद्य यांनी दिली.
