''''रंगीबेरंगी'''' साकारतोय!
|
चित्रपटातील कलाकारांची यादी वाचूनच रंगीबेरंगी बद्दल उत्सकुकता जागी होते. एकेकाळी मराठी चित्रपट रसिकांची मने जिंकणारे रविंद्र महाजनी यांचे पुनरागमन, नव्या जमान्यातले अघाडीचे अनिकेत विश्वासराव, मधुरा वेलणकर, हिंदी चित्रपटसृष्टीत व्यस्त मकरंद देशपांडे, मनोज जोशी, किरण करमरकर आणि सोबत आहेत मधु कांबीकर, हेमांगी कवी, प्रदीप वेलणकर, मेधा जांबोटकर, विद्या पटवर्धन, मिलींद सफई, श्रीरंग देशमुख, बालकलाकार हर्षदा पांचाळ आणि पाहुणे कलाकार उपेंद्र लिमये. शिवाय यांच्या पाठी आहे दमदार तंत्रज्ञांची टीम. कथा-पटकथा आहे संदीप कश्यप यांची. संवाद लिहिले आहेत संजय पवार यांनी. छायाचित्रण आहे देबू देवधर यांचे. कलादिग्दर्शन आहे एकनाथ कदम यांचे. संकलक आहेत अमित पवार.
|
चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत पवन वैद्य. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन आराधना स्टुडिओ, अंधेरी येथे चालू आहे.
