वासनेचा काळाशार ‘डोह’
- दीपक जाधव
|
|
कमळीला तिच्या वर्गातील मुलं मुली आपल्यात खेळायला घेत नाहीत आणि तिचे शिक्षकही तिला टाकून बोलतात. वर्गातल्या एका गुंड मुलाची आणि गावातल्या वाण्याची तिच्यावर नजर आहे. पण तिला मात्र मुंबईहून आलेल्या हुषार आणि देखण्या अजयबद्दल ओढ वाटू लागते. वासनेच्या आहारी गेलेल्या भिकीला अजयचं राजबिंडं रूप पाहून अजयला शारीरिक जवळिकीच्या जाळयात पकडण्यासाठी भिकी कमळीवर दबाव आणते. राजबिंडया अजयबद्दलची निरागस ओढ आणि भिकीचा सततचा दबाव यामुळे गोंधळून कमळी अजयला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते. व एक दिवस अजय व कमळीला एकांतात त्या स्थितीत पाहून भिकी अजयकडून जबरदस्तीने कामसुख मिळवते. पुढे अजय व कमळीचं काय होतं? कमळीला वेढणारा शारिरिक पशुवृत्तीचा काळाशार डोह तिचा बळी घेतो, की त्यातून सावरून ती ताकदवान बनते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी डोह पहायला हवा.
|
हा चित्रपट येत्या २८ मार्चपासून मुंबईत प्लाझा (दादर), आयमॅक्स (वडाळा), हुमा (कांजुरमार्ग), मुव्हीस्टार (गोरेगांव), आरमॉल (मुलुंड) आणि वंडरमॉल (ठाणे) या ठिकाणी प्रदर्शित होत आहे.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....
