1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र

स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे

- चंद्रकांत शिंदे

रईस लष्करिया प्रॉडक्शन निर्मित स्वराज्य मराठी पाउल पडते पुढे या मराठी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच मुंबईत पार पडला. रईस लष्करिया यांचा निर्माता म्हणून या पहिलाच चित्रपट असून दिग्दर्शन विशाल-विहार करीत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा विहार घाग यांची असून संवाद विहार घाग आणि मंदार गायच्च्मी यांचे आहेत.

गीते विहार घाग यांची आहेत तर संगीत दिले आहे नितिन हिवरकर यांनी. चित्रपटात राजेश श्रृंगारपुरे, अरुण नलावडे. अंशुमन विचारे, इला भाटे, राजन बने, जयंत पाटेकर, नम्रता गायकवाड, सुश्रृत मंकणी, वर्षा दांदले, किरण माने, निर्मला कोटणीस, रमेश वाणी इत्यादी कलाकार काम करीत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतीली कलाकार दर्शन जरीवाला आणि शाहबाज खान ही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा