1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 21 मार्च 2016 (10:41 IST)

‘1234’चा ट्रेलर रिलिज

marathi movie 1234
मिलिंद कवडे दिग्दर्शित व संजय नार्वेकर अभिनित आगामी चित्रपट ‘१२३४’ या चित्तथरारक सिनेमाचा ट्रेकर नुकताच रिलिज करण्यात आलाय. या सिनेमात मराठीतील अनेक मोठे मोठे कलाकार बघायला मिळणार आहेत. भूषण प्रधान आणि संजय नार्वेकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे. २७ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 
भारतातील ही अशी पहिली फिल्म आहे ज्याचे चित्रण ‘शिफ्ट । टिल्स ’ या लेन्सेस वर झाले आहे.. प्रथमच एखाद्या मराठी चित्रपटात मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील तब्बल २८ दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. चित्रपटात भूषण प्रधान, प्रिया मराठे, विजय कदम, अंशुमन विचारे, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, विशाखा सुभेदार, संजय मोने, यतीन कार्येकर, कमलेश सावंत, अभिजीत चव्हाण आणि संजय नार्वेकर यांच्या भूमिका आहेत.