आघाडीचे बंडखोर जोरात!
विधानसभा निवडणुकांची तारीख जशी जशी जवळ येते आहे तसे 'घड्याळा'चे काटेही दूर होत आहेत, तर काहींच्या घड्याळाची चावी संपली, काहींनी उमेदवारीसाठी अधिकृत 'हात' न मिळाल्याने बंडाचा हात उगारला आहे. अशा दोन घडमोडी गुरूवारी सकाळी सत्तारूढ आघाडीतच घडल्या आहेत. खानविलकरांनी राष्ट्रवादीला बाय बाय करत चावी संपल्याचे जाहीर केले तर अमरावतीतून काँग्रेसच्या सुनील देशमुख यांनी हातात बंडाचे निशाण घेतले.
अमरावती मतदारसंघात राष्ट्रपतींचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत राज्याचे अर्थ राज्यमंत्री असलेल्या सुनील देशमुख यांनी बंड पुकारले. त्यासंदर्भात सुनील देशमुखांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिला.
तसेच कार्यकर्त्यांना डावलून पक्षाने कोल्हापूरात उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादीला बाय बाय करत दिग्विजय खानविलकर यांनी अपक्ष उमेदवारी घोषित केली.
दरम्यान, आज गुरूवारी दुपारपर्यंत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गजांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.