दौलतराव आहेर पुन्हा भाजपत
राष्ट्रवादीकडूनही निराशाच पदरी पडल्याने राष्ट्रवादी नेते, माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दौलतराव आहेर यांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. आहेर यांनी काही वर्षांपूर्वी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
आपल्या मुलगा राहुल याला तिकिट मिळावे अशी त्यांची इच्छा होती. राहुल यांना तिकिट देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने आहेर यांनी राष्ट्रवादीला राम राम केला आहे.
आता राहुल यांना भाजपकडून तिकिट मिळणार आहे. राष्ट्रवादीत आपली घुसमट होत असल्याने आपण भाजपत परतत असल्याचे आहेर यांनी म्हटले आहे.