रिडालोसला भगदाड, गवई बाहेर
रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर गवई गटाचे नेते डॉ राजेंद्र गवई यांनी रिपब्लिकन डावे लोकशाही समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीला झटका बसला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच आघाडीला पाठ दाखवली आहे, आता आघाडीचा संसार सुरु होण्यापूर्वीच गवईंनीही फारकत घेतल्याने आघाडीतील हवा निघाल्याचे बोलले जात आहे.
राज्यात 13 तारखेला मतदान होणार असून, यासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. आठवले यांच्याशी या बाबतीत मतभेद झाल्यानंतर आपण आणि कार्यकर्त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे गवई यांनी स्पष्ट केले आहे.
पक्ष आता स्वबळावर विदर्भातील 15 जागांवर आपले निवडणूक लढवणार असून, आघाडी स्थापन करण्यासाठी आपण केलेले सारे प्रयत्न वाया गेल्याचे गवई यांचे म्हणणे आहे.