kite festeval, Makarsankrant | नात्यांचा पतंग उंच विहरू द्या!
|
* आपल्या जीवनातही पतंगांप्रमाणेच विविध रंग असतात. आनंद-दु:ख, राग-लोभ, हताशा-निराशा, काही मिळविणे-काही गमावणे, आश्चर्य- भिती असे कितीतरी.
* पतंगाप्रमाणेच आपणही जीवनात आकाशाला गवसणी घालण्याचा व खूप उंच जाण्याचे स्वप्न पाहत असतो.
* ज्याप्रमाणे काचेचा चुरा व डिंक याने बनविलेला मांजा सहजा-सहजी तुटत नाही त्याचप्रमाणे प्रेम व विश्वासाच्या पक्क्या धाग्यांनी नाती मजबूत होतात.
* धाग्याशिवाय पतंग अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे जीवनाची नाती एक दुसर्यांच्या सहकार्याशिवाय अपूर्ण आहेत.
* एकट्यानेच पतंग उडविणे फारच अवघड जाते. शेवटी पतंग उंच जावा असे वाटत असेल तर मांज्याची रिळे धरण्यासाठी व ढिल देण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावीच लागते.
*पतंग हवेच्या रोखानेच उडतो आपणही अनुकूल दिशा ओळखूनच जीवन जगलो तर ते अधिक सोपे होते.
* पतंगाला गाठ पडली तर तो कापला जातो. नात्यातही संशयाच्या, गैरसमजूतीच्या, रागाच्या निरगाठी पडल्या तर त्या सुटत नाही. उलट नाती तुटण्याचीच शक्यता असते.
* पतंगाला असलेल्या शेपटीने त्याचा तोल सांभाळला जातो. जीवनातही धैर्य हेच काम करते. आपल्यात जेवढे धैर्य असेल तेवढा नात्यांत तोलही सांभाळला जातो.
* कधी-कधी पतंगाला ढिल द्यावी लागते. जीवनातही नेहमी ओढाताण न राहू देता ढिल देत राहा म्हणजे जीवन खाली-वर असे न रहाता एकाच तालात चालत रहाते.
* पतंग उडविताना बर्याचदा हात कापला जातो. जीवनातही आनंदाच्या उड्डाणासोबतच दु:खाने आपण घायाळ होतो.
* मांजा पकडणारा व पतंग उडविणारा यांच्यात व्यवस्थित ताळमेळ असावा लागतो. हाच ताळमेळ नात्यातही उपयुक्त ठरतो.
* पतंग कितीही उंच उडाला तरीही मांज्याचा रिळ जमिनीवरच राहतो. याप्रमाणेच आपण जीवनात कितीही यशस्वी झालो तरी पाय जमिनीवरच असायला हवे.
* कधी-कधी पतंग कापलीही जाते. म्हणजेच जीवनात आपण अयशस्वीही होऊ शकतो. पण त्याने घाबरून न जाता नवा पतंग घेऊन त्याला उडविण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आयुष्यात अपयश आले तरी ते झटकून नव्याने प्रयत्न करा.
मकर संक्रांतीचा शुभेच्छा...
