1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (14:27 IST)

पुणतील मोर्चासाठी बैठकांना प्रारंभ

Maratha Aarakshan
येत्या 25 तारखेला पुण्यात होणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हे संयुक्त बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. 
 
परिवर्तनवादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात परस्पर समन्वयी भूमिका निर्माण व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेड आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले.