1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
  4. हा आठवडा आणि तुमचे भविष्यफल

हा आठवडा आणि तुमचे भविष्यफल

मेष
 

या आठवड्यात आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. व्यवसाय उद्योगात महत्त्वाचे निर्णय घेताना आपले तत्व सोडू नका. कोणत्याही प्रलोबनांना बळी पडू नये. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. 


वृष

WD
WD

महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून चांगले यश लाभेल. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. अंधश्रद्धेला बळी पडू नका. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा.

मिथु

WD

आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. भागीदारी व्यवसायातून जबाबदारीची कामे स्विकारावी लागतील. स्वत:ची मत, अपेक्षा, इच्छा काबूत ठेवून मगच महत्वाचे निर्णय घ्यावेत. अनावश्यक प्रवास टाळावेत. घरातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता जाणवेल.

कर्

WD

या आठवड्यात घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखले जातील. सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आपण हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल.

सिंह

WD

कुटुंबियांकडून मदतीचा हात पुढे योईल. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. प्रॉपर्टीच्या व गुंतवणूकीच्या दृष्टीने हा आठवडा आपणांस शुभफलदायी आहे. नव्या जोमाने कामाला लागाल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. कार्यकौशल्याची प्रशंसा होईल.

कन्या

WD

कौटुंबिक आनंद वाढविणार्‍या घटना घडतील. आव्हानात्मक कामातून यशस्वी व्हाल. धाडसी निर्णय घेतले जातील. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. एकमेकांशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध.णो सोपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. परप्रांताशी आपले व्यावसायीक संबंध सुधारतील. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल.

तू

WD

घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपल्या व्यवसायात जवळच्या नातलगाला सहभागी करुन घ्याल. एखाद्या कौटुंबिक समस्येवर आपण तोडगा काढाल. आपल्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळेल. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परीचय होतील.

वृश्चि

WD

बौद्धीक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. सामाजिक पत उंचावेल अशी खरेदी कराल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपणांस यश मिळणार आहे. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल. आपल्या राशीच्या व्ययस्थानातील शनिवरुन चंद्राचे भ्रमण होत आहे. पूर्वनियोजित प्रवासात बदल करावे लागतील. आपल्याला संयम आणि सहनशीलता दाखवावी लागेल.

धनु

WD

ध्यानधारणेत प्रगती होईल. आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला ठसा उमटवाल. उत्तरार्धात मात्र आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. स्वकष्टाचा पैसा मिळेल. कुटुंबियांसाठी खर्च कराल. घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा.

मक