1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

DLF ने जमवले 100 कोटी रुपये

डीएलएफने दिल्लीत आपल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 100 कोटी जमा केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कॅपिटल ग्रीन्सच्या दुसऱ्या टप्प्यात कंपनी शिवाजी मार्गावर 1,250 अपार्टमेंटचा भव्य प्रकल्प सुरू करत असून, यासाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

अवघ्या दोन तासात कंपनीच्या सर्वच अपार्टमेंटचे बुकिंग पूर्ण झाले असून, या माध्यमातून कंपनीने 100 कोटी जमा केले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील फ्लॅटची 1.86 कोटी रुपयांवर विक्री झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.