1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Flipkart

फ्लिपकार्टचे संजय बवेजा यांचा राजीनामा

फ्लिपकार्टचे चीफ फायनन्शियल ऑफिसर संजय बवेजा राजीनामा
फ्लिपकार्टचे चीफ फायनन्शियल ऑफिसर संजय बवेजा यांनी राजीनामा दिला आहे. फ्लिपकार्ट सध्या स्पर्धक कंपनी अमेझॉनला टक्कर देत आहे. त्यातच आर्थिक विभागाच्या अधिकाऱ्याचा राजीनामा फ्लिपकार्टसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

बवेजा यापूर्वी टाटा कम्युनिकेशन्समध्ये सीएफओ पदावर कार्यरत होते. त्याअगोदर बवेजांनी एमार आणि एअरटेलमध्येही काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वी बवेजांना फ्लिपकार्टच्या सीएफओपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
पुढील लेख
आता ‘धनत्रयोदशी’ ला 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा होणार