मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (10:03 IST)

सर्व बंधने रिझर्व्ह बँकेकडून मागे

केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर बँकेतून तसेच एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली सर्व बंधने रिझर्व्ह बँके ने सोमवारपासून मागे घेतली. त्यामुळे देशातील अर्थव्यवहार आता पुन्हा ८ नोव्हेंबरच्या पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आहेत.  भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी सांगितले की, बचत खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा सध्या असलेली कायम राहील. २८ फेब्रुवारीपासून बचत खात्यातून खातेदारांना ५० हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याआधी बचत खात्यातून एक सप्ताहात २४ हजार रुपये काढता येत होते. देशातील चलनाचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधीच चालू खाती तसेच कॅश क्रेडिट खात्यांमधून रक्कम काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. याआधी १ फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध शिथिल केले होते.