1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
  6. एअर इंडियाचा संप मिटला

Air India executive pilots call off strike | एअर इंडियाचा संप मिटला

नागरिक उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर एअर इंडियाच्या वैमानिकांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.

मागील पाच दिवसांपासून कर्मचारी संपावर गेल्याने कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पटेल यांनी आज वैमानिकांनी कामावर परतावे अन्यथा सरकारला कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला होता.

आज अखेर वैमानिकांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने वैमानिकांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा