एअर इंडियात वेतन कपात
एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कंपनीने आता कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली असून, कंपनीच्या संचालकांचाही पगार कमी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने कंपनीने असे आदेश दिले असल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पीएलआय (प्रॉडक्टिव्हीटी लिंक्ड इंसेंटिव्ह) मध्ये ही कपात करण्यात येणार आहे.
मागील दोन महिन्यांचे बाकी असलेले पीएलआय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दरमहिन्याला कंपनीचे 400 कोटी फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च केले जातात. तर दोन महिन्यांचा पीएलआय देण्यासाठी कंपनीला 200 कोटी रुपयांची गरज आहे.