1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

चहाची निर्यात घसरली

चहाची निर्यात घसरली
चालू आर्थिक वर्षातील जानेवारी ते जून महिन्यादरम्यान भारतीय चहाच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्क्यांची घसरण झाल्याने निर्यात नऊ कोटी 40 लाख किलोवर आली आहे.

मागील वर्षात याच कालावधीत 10 कोटी 93 लाख चहा देशाबाहेर पाठवण्यात आला होता. उत्पादन घसरल्याने आणि भारतीय बाजारात मागणी वाढल्याने निर्यात कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चालू वर्षात चहाच्या उत्पादनात 3.3 टक्क्यांची घसरण झाल्याने ते 46.08 कोटी किलो झाले आहे. चहाची निर्यात कमी झाली असली तरी यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मात्र चांगलीच वाढ झाली असून, हे उत्पन्न 12.6 अब्ज रुपयांवर गेले आहे.