1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

जगभरात पोलाद उत्पादनात वाढ

मंदीचा दबाव झुगारत मागणी वाढल्याने जगभरात पोलाद उत्पादनात वाढ झाली आहे. जागतिक स्टील असोसिएशनने या संबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात जगभरात 10 कोटी टन 65 लाख टन पोलाद उत्पादन करण्यात आले. जुलै महिन्यात 10 कोटी 39 लाख टन पोलाद निर्मिती करण्यात आली होती.

मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात यात 5.5 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे सांगतानाच मागील पाच महिन्यांपासून यात सातत्याने वाढ होत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

आर्थिक मंदीमुळे जगभरातील विविध उत्पादनात घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा मागणी वाढत असल्याने यात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.