1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

जेटचे वैमानिक संपावर जाणार?

जेट व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची बैठक फोल ठरल्यानंतर आता जेटचे वैमानिक सात सप्टेंबर पासून संपावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जेटच्या दोन वैमानिकांना काढून टाकण्यात आल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे. या वैमानिकांच्या सहकाऱ्यांनी या दोघांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली आहे. कंपनीने ही मागणी फेटाळून लावली असून, या संबंधात आयोजित करण्यात आलेली बैठकही कोणत्याही निर्णयाशिवाय संपल्याने आता संप अटळ मानला जात आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा