1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

.... तरच सिंगूरची जागा परत देणार- टाटा

सिंगुरमधील जागेसंदर्भात राज्य सरकारने आर्थिक करार केला, आणि यात कंपनीला फायदा होत असेल तरच सिंगुरमधील जमीन पश्चिम बंगाल सरकारला परत देण्यात येईल असे टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्रालयाशी या संदर्भात चर्चा सुरू असून, त्यांनी ठोस आश्वासन दिल्यास सिंगुरमधील जागेवर रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात येईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. यावर टाटा मोटर्सने ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने टाटा मोटर्सला रेल्वे प्रकल्पाविषयीची सूचना दिली असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री निरुपम सेन यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीला फायदा होईल असा अर्थपूर्ण करार करण्यास राज्य सरकार तयार असेल तर कंपनीही त्याला तयार असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.