1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

पेट्रोलपंपांचे कमिशन वाढले

पेट्रोलपंपांचे कमिशन वाढले
पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून देशातील पेट्रोल पंप मालकांची ही कमिशन वाढवण्याची मागणी होती.

पेट्रोलचे कमिशन वाढल्याने ग्राहकांवर याचा कोणताही भार पडणार नसल्याचे पेट्रोलियम कंपन्यांचे म्हणणे आहे.

आता पर्यंत पेट्रोलपंप संचालकांना प्रती किलो लीटर डिझेलवर 631 रुपयांचे कमिशन मिळत होते ते आता 673 रुपये झाले आहे.
पेट्रोलचा विचार करता आता पेट्रोल पंप मालकांना 1052 प्रती किलो लीटर ऐवजी 1125 रुपये मिळणार आहेत.

अखिल भारतीय पेट्रोलियम डील असोसिएशनने आतापर्यंत अनेकदा कमिशनसाठी बंदची हाक दिली होती.
About Writer
वार्ता