भारतात मंदी नाहीचः मनमोहन
जागतिक मंदीमुळे भारताच्या निर्यातीवर काही अंशी परिणाम झाला असला तरीही देशात कुठलेही आर्थिक मंदी नसून भारतीय अर्थव्यवस्था साडे सहा टक्क्याच्या गतीने प्रगती करीत असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जाहीर केले. पीट्सबर्ग येथे जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांच्या संमेलनात त्यांनी हे मत व्यक्त केले. जगाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि त्यात स्थिरता येण्यासाठी भारताची भूमिका महत्वाची ठरेल असेही त्यांनी सांगितले.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
