1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

भारतात वाढले पोलाद उत्पादन

भारतात वाढले पोलाद उत्पादन
भारतीय पोलाद कंपन्यांचा जगभर दबदबा आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय पोलादाची मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून पोलाद निर्मितीत भारत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

पोलाद मंत्रालयाने या संबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त यंत्र समिती जेपीसीचे कार्यकारी सचिव गौतम बसाक यांनी या विषयी माहिती दिली.

2008-09 मध्ये भारतात 5.5 कोटी टन पोलाद उत्पादन केले. या काळात देशातील पोलाद उत्पादन वाढल्याने भारत पाचव्या क्रमांकावर आला आहे. चालू वर्षात एप्रिल पासून ते ऑगस्ट दरम्यान भारताने 2.214 कोटी टन पोलाद निर्मिती केली आहे.