- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - वाणिज्य वृत्त
मंदीतही सीईओंची चांदी
आर्थिक मंदीचे भूत मानगुटीवर बसल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन कापले होते. या काळात जगभरातील अनेक कंपन्यांतील सीईओ (मुख्यकार्यकारी अधिकारी) ची मात्र चांदी झाली असून, या काळात त्यांच्या पगारात कोणतीही कपात झाली नसल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. आर्थिक मंदीच्या कारणांविषयी चर्चा सुरू असताना अनेक कंपन्यांचे सीईओंचे वेतन याला मुख्य कारण असल्याचे आरोपही झाले. द कॉर्पोरेट लायब्रेरी ने या संदर्भात एक सर्वेक्षण केले. यात संस्थेने सीईओंचे वेतन किती, त्यात किती कपात झाली, याची माहिती काढली. अनेक कंपन्यांनी मंदीच्या काळातही आपल्या सीईओंच्या वेतनात कोणतीही कपात केली नव्हती तर काही कंपन्यांनी कपात केली ती केवळ नाममात्र असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. संस्थेने यासाठी जगभरातील 2,700 कंपन्यांतील सीईओंचे सर्वेक्षण केले होते.