1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

महागाई दरात आणखी घसरण

29 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर आणखी घसरला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात हा दर शून्याखाली 0.21 टक्क्यांवर होता. आता हा दर 0.12 टक्क्यांवर आला आहे.

मागील काही दिवसांपासून देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. साखर, तांदूळ, डाळ, या सारखे महत्त्वाचे पदार्थ महाग झाले आहेत. असे असताना महागाई दर मात्र शून्याच्या वर डोके काढण्यास तयार नसून, आता हा दर शून्याखाली 0.12 टक्क्यांवर आला आहे.
यापूर्वी मागील वर्षातील याच कालावधीत हे दर 12.38 टक्क्यांवर होते.