1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

राजू यांना हिप्पेटायटिस

सत्यमचे माजी संचालक आणि कंपनीतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी असलेले कंपनीचे संस्थापक रामलिंग राजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना छातीत दुखत असून, हिप्पेटायटिसची लक्षणंही दिसून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राजू यांना HCV क्रॉनिक हिप्पेटायटिस झाला असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

राजू यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना येथील चंचलगुडा तुरुंगातून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या शरीरामध्ये हिप्पेटायटिसची लक्षणं दिसून आली आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा