1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

साखरेचे उत्पादन घसरणार

साखरेचे उत्पादन घसरणार
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या कर्नाटकात पावसाने थैमान घातल्याने चालू वर्षात साखरेचे उत्पादन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकात आलेल्या पुरात ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात आतापर्यंत पावसाने दडी मारल्याने खरीप पिकं वाया गेली होती. आता पावसाने थैमान घातल्याने रबी पिकंही गेल्याने साखर पुन्हा एकदा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश पाठोपाठ कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन केले जाते. 2008-09 मध्ये साखरेचे उत्पादन 40 टक्क्यांनी घसरत दीड कोटी टनवर आले आहे. 2007-08 मध्ये भारताने 50 लाख टन साखर आयात केली होती. चालू वर्षातही उत्पादन घसरल्याने याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा