1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2017 (11:47 IST)

Devdatt नागे ‘वेलकम टू पट्टाया’ चित्रपटात झळकणार

devdatt will come back with new role

खंडेराया अर्थात देवदत्त नागे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. गेली 3 वर्षे देवदत्तने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे.  मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच देवदत्त त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटात देवदत्तची वेगळी भूमिका असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘वेलकम टू पट्टाया’ असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात देवदत्त नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबतचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. तसेच, यात देवदत्तसह वरद चव्हाण आणि विजय चव्हाण हेदेखील दिसणार आहेत.  या चित्रपटाची कथा प्रशांत नेमण याची आहे, तर संगीत आनंद मेनन यांचे आहे. चित्रपटातील संवाद संजय सावंत यांचे आहे.