1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

भारताची प्रथम फलंदाजी!

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात पियुष चावलाच्या जागी मुनाफ पटेलची निवड करण्यात आली आहे.

ब गटातील बलाढ्य संघांमध्ये होत असलेल्या या सामन्यात विजय मिळविण्याचे दोन्ही संघांचे प्रयत्न असणार आहेत. भारतीय संघात आज तीन जलदगती गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मागील सामन्यात इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे.

क्रिकेट स्कोअरकार्ड
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा