1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Sant Shri Nivruttinath Maharaj Punyatithi 2026 Messages in Marathi

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Sant Shri Nivruttinath Maharaj Punyatithi 2026 Messages in Marathi

ज्ञानाचा दिवा लावून जगताला सन्मार्ग दाखवणारे सद्गुरू, 
संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचे थोरले बंधू 
व मार्गदर्शक संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांना 
पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!
 
गहिनीनाथांचे शिष्य आणि ज्ञानेश्वरांचे गुरू, 
ज्यांच्या कृपेने वारकरी संप्रदायाची भक्कम पायाभरणी झाली, 
अशा आद्य संत श्री निवृत्तीनाथ महाराज 
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
 
"निवृत्तीचे पाऊल देखिले दृष्टी। तेणे सुख सृष्टी सुखावली॥"
शांतता, भक्ती आणि समाधानाचा मार्ग दाखवणाऱ्या 
संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या स्मृतीस पुण्यतिथी निमित्त विनम्र वंदन!
 
वारकरी संप्रदायाचे मूळ आणि माऊलींचे गुरू, 
संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त 
त्यांच्या चरणी शतशः नमन!
 
अहंकार सोडून भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या 
सद्गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज 
यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन!
 
ज्यांनी माऊलींना 'ज्ञानेश्वर' बनवले, 
त्या आदिगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या 
पावन स्मृतीस पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!
 
"योगियांचा चक्रवर्ती | ज्ञानदेवाचा तो गुरूराज ॥"
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, 
संत ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू 
संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या 
पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी विनम्र अभिवादन!
 
निवृत्तीनाथांचे मानिले गुरू। त्यांनी दाखविला भवसिंधूचा पारू॥
संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज
संजीवन समाधी दिनानिमित्त महाराज चरणी त्रिवार वंदन!
 
त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत संजीवन समाधी घेतलेल्या, 
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रणेते 
संत निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
 
जय जय राम कृष्ण हरी!
संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या 
संजीवन समाधी दिनानिमित्त 
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत!
पुढील लेख
Career Tips: डिप्लोमा इन पॉलिटेक्निक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करा करिअरची दमदार सुरुवात