1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Birthday Wishes For Friend in Marathi

Birthday Wishes For Friend in Marathi मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावा, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 
देव करो आणि तुला या वर्षी 
आयुष्यातील सर्व सुख, समृद्धी आणि यश मिळो
आपली मैत्री अशीच जन्मोजन्मी टिकून राहो!
 
नेहमी पाठीशी उभा राहणाऱ्या 
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू फक्त मित्र नाहीस, 
तर माझा भाऊ आहेस
आजचा दिवस तुझा आहे, धमाल कर!
 
सुख असो वा दुःख, 
जो नेहमी हक्काने धावून येतो 
अशा माझ्या लाडक्या मित्राला 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझा येणारा काळ यशाने 
आणि आनंदाने भरलेला असावा, हीच प्रार्थना
 
जगातील सर्वात भारी मित्राला 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
तू आयुष्यात जे काही स्वप्न पाहिले आहेस, 
ते सर्व पूर्ण होवोत
नेहमी असाच हसत आणि हसवत राहा
 
मैत्री काय असते हे ज्याने मला शिकवले, 
अशा माझ्या जिवाभावाच्या मित्राला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भावा, तू आहेस म्हणून लाईफमध्ये एवढी धम्माल आहे
थँक्यू फॉर एव्हरीथिंग!
 
तू केवळ एक चांगला मित्र नाहीस, 
तर एक उत्तम माणूस आणि मार्गदर्शक आहेस
अशा माझ्या खास मित्राला 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझा आजचा दिवस आनंदात जावो!
 
भावा, तुझ्या वाढदिवसा निमित्त एकच इच्छा आहे की, 
तू जे काही मिळवू इच्छितोस ते तुला सहज मिळो
वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा, संध्याकाळी पार्टी ठरलीये आपली!
 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या 
आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या 
माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देव तुला दीर्घायुष्य देवो
 
तुझ्यासारखा समजूतदार आणि वेळेला धावून येणारा मित्र मिळायला भाग्य लागतं
माझ्या या लाडक्या दोस्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी आनंदी राहा आणि प्रगती करत राहा!
 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा! 
तुझ्या आयुष्यात कधीच दुःखाची सावली न येवो, 
आणि तुझे घर नेहमी सुख-समाधानाने भरलेले राहो, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 
गोड स्वभावाच्या आणि नेहमी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या 
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे नवीन वर्ष तुझ्यासाठी खूप साऱ्या चांगल्या संधी आणि आनंद घेऊन येवो
 
हक्काने भांडणारा पण तितकीच काळजी घेणारा माझा भाऊ, 
म्हणजेच माझा सर्वोत्कृष्ट मित्र! 
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
तुझी सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत
 
पैशाने माणूस श्रीमंत होतोच, 
पण तुझ्यासारखा मित्र ज्याच्याकडे आहे 
तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे
माझ्या अशा श्रीमंत दिलाच्या मित्राला 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, 
पण तुझ्यासारखे हक्काचे माणूस कायम सोबत राहतात
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भावा! 
आजचा दिवस खूप स्पेशल पद्धतीनी एन्जॉय कर
 
माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्रेझी गोष्टीचा पार्टनर असणाऱ्या 
माझ्या बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली ही मैत्री अशीच आयुष्यभर जपून ठेवायची आहे
गॉड ब्लेस यू भावा!
About Writer
रूपाली बर्वे
मीडिया क्षेत्रातील २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रूपाली बर्वे या एक अष्टपैलू पत्रकार आणि संपादक आहेत. मागील २० वर्षांपासून त्या 'वेबदुनिया' पोर्टलशी जोडलेल्या असून सध्या 'असिस्टंट एडिटर' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी फील्ड रिपोर्टिंग, कंटेंट रायटिंग, डेस्क एडिटिंग आणि डिजिटल मीडिया अशा विविध स्तरांवर काम केले असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती.... आणखी वाचा