1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
  4. फॅशनेबल साइड पाउच

फॅशनेबल साइड पाउच

फॅशनेबल
ट्रेकिंग, लांबचा प्रवास, जिम, मार्निंग वॉक किंवा अगदी मंडईत जातानाही मोबाइल, पैसे, सामानाची यादी, प्रवासाची तिकीटं या सारखं साहित्य ठेवण्यासाठी साइड पाउचचा चांगला उपयोग होतो. मुलींमध्ये बॅग्जच्या अनेक व्हरायटीच पहायला मिळतात. त्यात अनेक कप्पे असतात. म्हणून मुलींना सामान ठेवणे सोपे आणि सोईचे होते, पण मुलांसाठी त्यांच्या व्हालेट किंवा पर्स व्यतिरिक्त दुसरी कुठलीही सोय नसते, पण डोन्ट वरी गाईज. या सर्व गोष्टींसाठी आता साईड पाऊच तुमच्यासाठी आले आहे. अगदी नव नव्या डिझाईन्स आणि आकारामध्ये. मुलांमध्ये सध्या त्याची जोरदार फॅशन आहे.

मुलींच्य बॅग्जमध्ये खूप व्हरायटीज पाहायला मिळतात, पण मुलांसाठी ही बॅग्ज, साइड बॅग्ज, रकसॅक, कंबरेला बांधायचे साइड पाउच, बेल्टस् अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. कंबरेला बांधायच्या साअड पाउचमध्ये सध्या चांगलंच वैविध्य पाहायला मिळतं. ही फॅशन फक्त शाळा-कॉलेजमध्येच नाही, तर ट्रेकर्स, जिमला जाणार्‍या मंडळींतही लोकप्रिय ठरतेय. घराची किल्ली, रुमाल किंवा नॅपकीन, मोबाईल, थोडेसे पैसे चालता चालता चघळायला एखाद-दोन गोळ्या असं साहित्य सहज बसू शकतं. यात ट्रेनची किंवा बसची तिकीटं, चोटा डिजीकॅम, टॉर्च, सुरी एखादं छोटं फळंही सहज मावू शकतं.

हे पाउच खांद्याला अहकवायचे किंवा हातात धरायचे नसल्यामुळे तसंच त्यात अगदी मोजकंच साहित्य ठेवायचं असल्यामुळे त्याचं वजनही फार नसतं. कंबरेला पट्टासारखे बांधल्यामुळे हातही मोकळे राहतात. सोबतच फॅशनही सांभाळल्या जाते. त्यामुळे कॉलेजगोईंग तरुणच काय तर तरुणींबध्ये सुद्धा याची क्रेझ बघायला मिळते. असे हे फॅशनेबल साईड पाउच जवळच्या मॉल्स, दुकानात, बॅग्ज किंवा स्टेशनरीच्या दुकानातही हे सहज मिळतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा