1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
  4. iran israel war world war 3 india superpower prediction

भविष्यवाणी: इराण-इस्रायल युद्ध ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी? भारताचा महासत्ता म्हणून उदय!

India Will Become a Superpower
सध्या जगाच्या नकाशावर युद्धाचे ढग दाटून आले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता, एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ज्योतिषशास्त्रीय गणिते आणि ग्रहांची बदलती चाल पाहता, येणारा काळ अत्यंत विनाशकारी पण भारतासाठी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
१. 'अंगारक  योग' आणि युद्धाची ठिणगी
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीत राहू आणि मंगळाचे संक्रमण होत असून यामुळे 'अंगारक  योग' निर्माण झाला आहे. हा योग आग, स्फोट आणि हिंसक घटनांना आमंत्रण देणारा मानला जातो. त्यातच सूर्य आणि चंद्रग्रहणांमधील कमी अंतर हे मोठ्या जागतिक युद्धाचे संकेत देत आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील धुमश्चक्री आणि इस्रायलने इराणवर केलेला हल्ला, ही याच ग्रहदशेची फळे आहेत.
 
२. १९ मार्च २०२६: 'रुद्र संवत्सर' आणि विनाशाचा काळ
खरे आव्हान अजून बाकी आहे. सध्याचा 'सिद्धार्थ संवत्सर' हा केवळ मोठ्या संकटाची पूर्वतयारी आहे. खरी उलथापालथ १९ मार्च २०२६ पासून सुरू होईल, जेव्हा 'रुद्र संवत्सर' सुरू होईल. 'रुद्र' म्हणजे विनाशाची देवता; त्यामुळे या काळात जगभरात मोठा नरसंहार आणि नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. मध्य आशियातील युद्धाच्या ज्वाळा दक्षिण आशियात, विशेषतः भारताच्या शेजारील देशांमध्ये पसरू शकतात.
 
३. गुरूचे भ्रमण आणि राजनैतिक गोंधळ
मिथुन राशीतील गुरू (जून २०२६ पर्यंत): या काळात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर अफवांचे पीक येईल. खोट्या बातम्यांमुळे देशादेशांमधील संवाद तुटेल आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन युद्ध भडकेल.
 
कर्क राशीतील गुरू (जून २०२६ नंतर): जेव्हा गुरू आपल्या उच्च राशीत (कर्क) प्रवेश करेल, तेव्हा जगभरात तीव्र राष्ट्रवादाची लाट येईल. प्रत्येक देश स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे संघर्षाची धार अधिक तीव्र होईल.
 
४. २०२६ मधील नैसर्गिक संकटे
जुलै ते ऑगस्ट २०२६ दरम्यान सूर्य, चंद्र आणि गुरू यांचा कर्क राशीत संयोग होईल. पुष्य नक्षत्राच्या प्रभावामुळे या काळात प्रचंड पूर, आगीच्या घटना, मोठे भूकंप आणि ज्वालामुखींचा उद्रेक होण्याची भीती आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीच्या भूगोलातही मोठे बदल होऊ शकतात.
 
५. भारत: युद्धाच्या आगीतून तावून सुलाखून निघणारी महासत्ता
ज्योतिषांच्या मते, २०२६ ते २०२७ या काळात भारत एका मोठ्या युद्धाचा भाग बनू शकतो. मात्र, मंगळाच्या प्रबळ स्थितीमुळे भारताची लष्करी ताकद—जमीन, पाणी आणि आकाश—या तिन्ही आघाड्यांवर अजिंक्य राहील.
 
शत्रू राष्ट्रांचे सर्व कट-कारस्थान भारत मोडून काढेल.
जरी हा काळ कठीण असला, तरी भारताची जागतिक प्रतिष्ठा आणि शक्ती प्रचंड वाढणार आहे.
२०२८-२९ पर्यंत शनीची चाल जुन्या जागतिक व्यवस्था नष्ट करून भारताला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवेल.
 
थोडक्यात सांगायचे तर शनीचा न्याय आणि ग्रहांची ही महादंगल जगाला विनाशाच्या गर्तेत नेणारी वाटत असली, तरी त्यातूनच एका नवीन जगाचा आणि 'शक्तिशाली भारताचा' जन्म होईल. जुन्या सत्ता संपुष्टात येतील आणि भारत 'विश्वगुरू' म्हणून जगाचे नेतृत्व करेल.
पुढील लेख
Holi Vastu Tips होळीच्या दिवशी हिंगाचा हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करेल