Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना
'शुभं करोति कल्याणम्' संध्याकाळच्या वेळी दिवा लावताना म्हटली जाणारी अत्यंत प्रसिद्ध आणि पारंपरिक मराठी श्लोक प्रार्थना आहे. हा श्लोक आणि त्याचे ओवीबद्ध चरण खालीलप्रमाणे आहेत:
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥
दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥
ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।
घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ।।३।।
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥४।।
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम् ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये ते विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ।।५।।
