दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?
जाणून घ्या महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
दीपपूजन किंवा दिव्याची अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येला साजरी केली जाते. या सणाला दीप अमावस्या असेही म्हणतात, ज्यामध्ये घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन त्यांची मनोभावे पूजा केली जाते. श्रावण महिन्याच्या पवित्र आगमनापूर्वी हा सण पाळला जातो.
२०२६ मध्ये दीप अमावस्या कधी आहे?
२०२६ मध्ये दीप अमावस्या १२ ऑगस्ट रोजी आहे.
अमावस्या तिथी प्रारंभ: ११ ऑगस्ट रोजी उ.रात्रौ ०१.५३ मिनिटाला
अमावस्या तिथी संपेल: १२ ऑगस्ट रोजी रात्रौ ११.०६ मिनिटाला
पूजेची पद्धत
घरातील पितळ, तांबे, चांदीचे सर्व दिवे आणि समया स्वच्छ घासून-पुसून चकचकीत करा.
ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा आणि रांगोळी काढा.
पाटावर सर्व दिवे ओळीने मांडा. त्यामध्ये तेल/तूप आणि वाती घालून सर्व दिवे प्रज्वलित (पेटवून) करा.
दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहा. दिव्यांसमोर विड्याचे पान आणि सुपारी ठेवा.
दिव्यांना दिव्यांच्या आवणीचा (गव्हाच्या पिठाचे गोड दिवे) नैवेद्य दाखवा.
शेवटी "दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन:" हा मंत्र किंवा शुभंकरोती म्हणा.
दिव्याची प्रार्थना (मंत्र):
"दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन।
दीपो हरतु मे पापं दीपज्योती नमोऽस्तुते॥"
दिव्याची पूजा का केली जाते? (महत्त्व)
तेजाचा सन्मान: दिवा हे प्रकाश, ज्ञान, सकारात्मकता आणि आरोग्याचे प्रतीक आहे. अंधार दूर करून जीवनात प्रकाश आणणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते.
श्रावणारंभ व मांगल्य: आषाढ संपून पवित्र श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात घरोघरी अनेक पूजा-अर्चा होतात. या धार्मिक कार्यांची सुरुवात दिव्यांच्या पूजनाने केली जाते.
नकारात्मकता दूर करणे: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात असणारी ओलसरपणा, कीटक आणि आजारपण दूर करून घरात लक्ष्मीचा वास राहावा, यासाठी दीपप्रज्वलन केले जाते.
आरोग्य व समृद्धी: दिव्याच्या पूजेने घरातील दुःख, दारिद्र्य आणि इडा-पिडा टळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अंधार आणि नकारात्मकता दूर करणे या सणाचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असा समज आहे. तसेच वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. ALSO READ: Deep Amavasya : दीप अमावस्या कहाणी मराठी
