Fruits and Vegetables in red Color | आहारात रंगीबिरंगी भाज्या, फळे खा!
संतुलित आहाराबद्दल नेहमीच बोलले जाते. पण वेगवेगळ्या रंगांचा वापरसुद्धा जेवणात करायला हवा हे माहित आहे का? निरनिराळ्या रंगांच्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना फायदा मिळतो.
लाल
छातीच्या संरक्षणासाठी लाल रंगांच्या भाज्या, फळं खायला हवेत. लाल (गुलाबी) रंगांच्या भाजीपाल्यात फायटो केमिकल्स असतात. टरबूज, पेरू, टोमॅटो इत्यादी या श्रेणीत येतात. स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि बीटरूटमध्ये एंथोसायनीन असतात. हा फायटोकेमिकल्समधील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित रहातो. डायबिटीससंबंधित समस्या आसपास फिरकत नाहीत.
पुढील पानावर पाहा हिरव्या रंगांच्या फळ व भाज्या...
हिरवा
हिरव्या फळ-भाज्यांमध्ये लुटीन व इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे आतड्यांचे संरक्षण होते. म्हणून हिरव्या रंगांच्या वस्तू भरपूर खायला हव्या.WD |
पुढील पानावर पाहा जांभळ्या रंगांच्या भाज्या व फळे...
जांभळा
मेंदू निरोगी रहाण्यासाठी जांभळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. उदा. जांभूळ, कांदे, जांभळ्या रंगाचा कोबी, वांगे इत्यादी.
