चविष्ट, आरोग्यदायी आणि पौष्टिकही असे Honey and Orange Flavored Chicken
हनी ऑरेंज फ्लेवर चिकन जेवढे चविष्ट, तेवढेच ते आरोग्यदायी आणि पौष्टिकही आहे. चिकन हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. चिकन खाल्ल्याने स्नायू बळकट होतात, तणाव कमी होतो आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आज आपण मध आणि संत्र्याच्या रसासोबत चिकनची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य-
२ बोनलेस चिकन
१५ मिली तेल
४० ग्रॅम चिरलेला कांदा
४० ग्रॅम सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
४५ ग्रॅम मध
६० मिली ताज्या संत्र्याचा रस
१ संत्रं
३० मिली डार्क सोया सॉस आणि चिरलेल्या भाज्या
कृती-
सर्वात आधी एका पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण थोडे नरम होईपर्यंत परतून घ्या. त्यात मध, डार्क सोया सॉस आणि संत्र्याच्या फोडी घाला. मध दिसेनासा होईपर्यंत सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्या. चिकन व्यवस्थित बेक करा. ते झाल्यावर त्यावर हे मिश्रण ओता. ओव्हनमध्ये १९०°C तापमानावर ४५ मिनिटे बेक करा. त्याचवेळी, चिकनवर संत्र्याचा रस ओता. हिरव्या पालेभाज्या आणि इतर भाज्यांनी सजवून गरमागरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
