1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (16:19 IST)

रोज सफरचंद खाऊनही पडते डॉक्टरची गरज

apple
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही. म्हणजे आजारपणाशी गाठ पडत नाही, हे आपण बालपणापासून ऐकत आला असाल. मात्र एका ताज्या अध्ययनात शास्त्रज्ञांनी सफरचंदाचा महिमा सांगणारा हा दावा खोडून काढला आहे. सफरचंदाच्या नियमित सेवनामुळे आजारपण चार हात दूर राहते, ही गोष्ट पूर्णत: मिथ्थक आहे. या अध्ययनादरम्यान शास्त्रज्ञांनी रोज कमीत कमीत एक छोटे सफरचंद (साधारणपणे १५0 ग्रॅमचे) खाणार्‍या आणि सफरचंद न खाणार्‍ाय लोकांचे परीक्षण केले. या अध्ययनात सहभागी केलेल्या ८३९९ लोकांपैकी ७५३ लोक दररोज नियमितपणे सफरचंदाचे सेवन करत होते तर उरलेले ७६४६ लोक सफरचंद न खाणारे होते. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या स्कुल ऑफ नर्सिंगच्या एन. आर्बर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार, सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही, हे एकप्रकारचे थोतांड आहे. उलट सफरचंदांचे नियमित सेवन करणारी मंडळी साधारणपणे छोट्यामोठय़ा व्याधींमध्ये औषधे घेण्यास टाळाटाळ करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.