1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

शांत झोप येण्यासाठी काही टिप्स...

* जास्त थकला असाल आणि झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधी-कधी ब्रॅंडीचे दोन घोट घेऊ शकता. फक्त महिन्यातून एक-दोनदा, त्यापेक्षा जास्त नाही.

* झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने मालीश करा. झोप येण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुमच्या शरीरालाही कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

* रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात एक चमचा मध टाकून प्या.

* रात्री जेवणात जास्त तेलकट आणि तिखट मिरचीचे पदार्थ टाळा. या पदार्थांमुळे झोप उडते.

* शांत झोप येण्यासाठी बेडरूम हवेशीर असण्यासोबतच कमी प्रकाश असणारी हवी. शांत झोप येण्यासाठी हे जरूरी आहे.

* झोपण्याआधी कोमट तेलाने हलक्या हातांनी डोक्याला मालीश करा.

* बरेच दिवस शांत झोप न आल्याने तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली तर बटाटे किसून त्याजागी लावा. त्यामुळे काळी वर्तुळे नाहीशी होतील.

* बाजारात अरोमा थेरेपी ऑइल उपलब्ध आहे. त्याचे दोन-चार थेंब बेडवर शिंपडण्याने तुम्ही शांत झोपेची मजा घेऊ शकता. पण याचा उपयोग कधी-कधीच करा.

* सकाळी लवकर उठून पायी फिरायला जा. हा देखील शांत झोप येण्याचा उत्तम उपाय आहे.

* रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शांत झोप तर येईलच पर शरीरही स्वस्थ राहील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा