‘गूळ-फुटाणे’घ्या आणि हार्ट अटॅकपासून रक्षण करा
गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. गूळ- फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच शिवाय सौंदर्यातही भर पडते.
चेहरा उजळतो – यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते.
अपचनापासून मुक्तता मिळते – गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व ऍसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.
स्मरणशक्ती वाढते- गूळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.
दातांची सुरक्षा – गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे खायला हवे.
ह्रदयाचे आरोग्य – यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.