गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (15:39 IST)

पुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे 6 मुख्य कारण जाणून घ्या

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन देखील असू शकत. त्याशिवाय काही हार्मोनल कारणे देखील जबाबदार असू शकतात. परंतु डोकेदुखी शरीराबद्दल बरेच काही सांगते. बर्‍याच वेळा डोकेदुखी फक्त डोकं दुखण्यामुळे होत नाही बलकी यामागे इतर कारण देखील असू शकतात. उदाहरणार्थ, शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा कोणताही रोग. हे देखील डोकेदुखीसारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरते.
 
* कोणत्या कारणास्तव आपल्याला डोकेदुखी असू शकते
 
1. तणाव - प्रत्यक्षात डोके दुखणे कोणत्या भागात आहे हे आपले मनःस्थिती ठरवू शकते. जर आपल्या डोक्याचे दोन्ही भाग दुखत असतील तर ते तणावग्रस्त आहे. तणावामुळे डोक्याच्या दोन्ही भागांमध्ये वेदना होते.
 
2. ब्रेन - जर तुमच्या मेंदूच्या भागास वेदना होत असेल तर, हे समजून घ्या की हे सामान्य दुखणे नाही. ही वेदना माइग्रेनची असू शकते. या साठी नर्व जबाबदार असतात. मेंदूतील वेदना बऱ्याचदा डोक्याच्या मध्यभागी अनुभवली जाते. आपल्याला असे अनुभव झाल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3. पचन तंत्र - बर्‍याचवेळा डोकेदुखी डोक्याशी संबंधित नसून पोटाशी संबंधित असते. पचन तंत्र योग्य नसल्यास, यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. बर्‍याच वेळा सतत डोके दुखत असेल तर ते अतिसाराचे लक्षण देखील असू शकतात.
 
4. इंद्रिये (सेंस) - कधीकधी कानामध्ये एक विशेष प्रकारचा आवाज ऐकू येतो, ज्यामुळे डोकेदुखी जाणवते. बर्‍याच वेळा फोनवर जास्त वेळ बोलण्यामुळे असे होऊ शकते. कधीकधी परफ्यूमच्या गंधामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अर्थातच वेगवेगळ्या इंद्रियांमुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो.
 
5. जास्तवेळ विचार करण्यामुळे - जेव्हा आपला मेंदू अनेक गोष्टींचा ओझं सहन करतो, तेव्हा देखील त्याला वेदना अनुभवतात. आपण बर्‍याच वेळेस काही विचारात अडकलेलो असलो तरी आपल डोकं दुखी लागत.
 
6. हार्मोन - डोकेदुखीमागील एक मुख्य कारण हार्मोन देखील असू शकतात. हार्मोन्समुळे हृदयाचे ठोके वाढू लागतात, फार घाम येतो. या बदलांमुळे देखील डोकेदुखीची समस्या येऊ शकतात.