शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (17:19 IST)

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य छिंदम मनपा निवणूक विजयी

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपा पदाधिकारी व माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला, आगोदर फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली़ होती व विजय मिळविला आहे. श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात चार फेऱ्या मध्ये  मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडीवर होते. नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली़ आणि त्याची ही आघाडी जवळपास  तेराव्या फेरीनंतर १८५० मतांपर्यंत पोहोचली होती. प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 
 
श्रीपाद छिंदमची पत्नी स्नेहा या प्रभाग १३ (क) मधून निवडणूक लढवत होत्या़ त्यांच्याविरोधात निलम गजेंद्र दांगट (राष्ट्रवादी) गायत्री नरेंद्र कुलकर्णी (भाजप), सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होते़ येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे़.