1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:52 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

Swabhimani Shetkari Sanghatana
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना कोणताही मदतीचा हात हे भाजप सरकार देत नसून पिक विम्याचा पहिला हप्ता देण्याबाबत जर पिक विमा कंपन्यानी 17 डिसेंबरपर्यंत पुढाकार घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ मराठवाड्यात तालुका जिल्हास्तरीय व जानेवारी महिन्यात नागपूर व संभाजीनगर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 
 
स्वाभिमानी शेतकर्‍यांच्या दुष्काळ व पिक विमा प्रश्नासाठी 17 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर उतरुन तालुका, जिल्हास्तरावर मोर्चे काढणार आहे. तर जानेवारी महिन्यात विभागीय स्तरावर मोर्चे काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कंपन्यांनी 2 टक्के सीएसआर दुष्काळासाठी खर्च करावा. स्वत:च्या कंपन्यानी स्थापन केलेल्या सेवेभावी संस्थेसाठी खर्च करू नये असा आग्रह सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.