बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:45 IST)

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. मात्र, त्या-त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. परंतु, समविचारी पक्षांनी एकत्र यायलाच हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिवसीय चिंतन शिबिर पुण्यातील हडपसर येथे पार पडले. 
 
निवडणुका आल्या की भाजपाला राममंदिराची आठवण येते. मंदिराच्या नावाखाली हे सर्व उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीच आता अन्याय सुरू केला आहे. दुष्काळातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करीत नाही. एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात, की ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे वेडेपणा आहे. ते टिकणार नाही, असे पवार यांनी सांगितले.