शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (17:34 IST)

शरद पवार - नारायण राणे साथसाथ

संसदेचा सभासद म्हणून या व्यवसायातील लोकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्यासाठी सरकारला आग्रहाची भूमिका घेण्यासाठीचे काम आम्ही करू असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी देवली उदय फार्म मत्स्य शेती केंद्र येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. 
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी सांगितले. 
 
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सुरुवातीला हा पहिला उपक्रम केला त्यावेळी  लोकांना तो यशस्वी होईल किवा नाही या बाबत शंका होती. पण व्हिक्टर डॉन्टस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हि शंका दूर केली. हि आपण काळजी घेतली, चांगले स्कील घातले. फिल्ड चांगले वापरले आणि मार्केटिंगची काळजी घेतली तर यात आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले.